Latest Marathi News

BREAKING NEWS

कोल्हापूरच्या कन्येला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक ; चंद्रकांतदादांनी केले अभिनंदन

0

पुणे |

कोल्हापुरची दिव्यांग खेळाडू आरती पाटीलने पेरू येथे पार पडलेल्या पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल चॅम्पियन शिपमध्ये कास्य पदकाला गवसनी घातली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी आरती पाटील यांनी भेट दिली. यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा ही दिल्या आहेत.

मुळची कोल्हापूरची असून तिच्या यशाने कोल्हापूरच्या शिरपेचातही मानाचा तुरा रोवला गेला आहे. जन्मतःच आरतीला डाव्या हाताने अपंग. घरातील आर्थिक परिस्थिती बेताची. बँडमिंटन या खेळात तिला गती असेल असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु, जन्मजात वैगुण्यावर जिद्दीने आणि मोठ्या मेहनतीने मात करत तिने याच खेळात थक्क करणारी या कामगिरी करून दाखविली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आरती पाटीलला आर्थिक पाठबळही दिले होते.

मुळात घरची परिस्थिती बेताची असलेल्या आरतीला दोन बहिणी असून एक बहीण विवाहित आहे तर एक बहीण शिक्षण घेत आहे. तर भाऊ प्रसाद पाटील हा गवंडी काम करत शिक्षण घेत आहे.आई भारती ज्ञानोबा पाटील गॄहिणी आहे. वडिल ज्ञानोबा पाटील हे गंवडी काम करतात. आतापर्यत तिने मैदानी खेळ,गोळाफेक,बॅडमिंटन,अशा विविध खेळात जिल्हा स्तर, राज्यस्तर आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.