Latest Marathi News

BREAKING NEWS

मनाच्या शांतीसाठी आमिर खान पोहोचला नेपाळला; 11 दिवस करणार विपशना

0

मुंबई |

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानचा गेल्या वर्षी ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याने मोठा निर्णय घेतला.

काही काळ अभिनयातून ब्रेक घेणार असल्याचं त्याने जाहीर केलं होतं. यानंतर तो आधी काही दिवस अमेरिकेला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेला. अमेरिकेतून परत आल्यानंतर त्याने कुटुंबीयांना वेळ दिला. यादरम्यान आमिरच्या मुलीचा साखरपुडा पार पडला. आता या ब्रेकदरम्यान

आमिर त्याच्या मनाच्या शांतीसाठी नेपाळला ध्यानसाधना करण्यासाठी गेला आहे. आमिर खान काठमांडू विमानतळावर पोहोचला आणि तिथून तो ध्यान शिबिरासाठी रवाना झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.