आमच्या पक्षात पृथ्वीराज चव्हाण यांचे १ नंबरचे स्थान, पवारांच्या प्रश्नाला नाना पटोले यांचे प्रतिउत्तर
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राज्यसभा खासदार शरद पवारांना काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याला ऊत्तर देताना पवारांनी खोचक टोला लगावला होता. त्यांनी त्यांच्या पक्षात त्यांचं काय स्थान आहे.. ते ए आहेत, की बी आहेत की सी आहेत की डी आहे ते आधी तपासून घ्यावे. त्यांच्या पक्षातल्या इतर सहकाऱ्यांना विचारले की चव्हाणांची कॅटेगरी कोणती आहे, तर ते तुम्हाला खासगीत सांगतील. जाहीर नाही सांगणार, असा खोचक टोला पवारांनी लगावला होता. त्यानंतर आता पवारांच्या या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाणांबद्दल केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना साताऱ्यात प्रश्न विचारला. त्यावर, “हाच सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांना विचारल्यावर प्रश्न उपस्थित होईल, असे म्हणत आमच्या पक्षात पृथ्वीराज चव्हाण यांचे १ नंबरचे स्थान आहे. आणि ते शेवटपर्यंत १ नंबरच असेल. पृथ्वीराज चव्हाण हे आमचे नेते होते आणि राहतील. भाजपच्या तानाशाहीविरुद्ध लढण्याची क्षमता पृथ्वीराज चव्हाणांमध्ये आहे. याचा आम्हाला स्वाभिमान आहे, असे नाना पटोले म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत? असा प्रश्न विचारल्यावर नाना पटोले म्हणाले, आम्हाला त्याच्या खोलात जायचे नाही. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. जो कोणी भाजपविरोधात समोर येऊन लढेल. त्याला घेऊन जाण्याची काँग्रेसची भूमिका आहे. आता पवारांच्या टीकेला दिलेल्या प्रतिउत्तरला प्रस्तरवाडी काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार असुंपवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाण या म्हणतात हे पाहणे सद्ध औसूक्तेचे ठरणार आहे.