Latest Marathi News

BREAKING NEWS

फडणवीसांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांचा उल्लेख नाही

0

मुंबई |

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहितीच दिली नव्हती. फडणवीसांचे वकील अ‍ॅड. उदय प्रभाकर डबले यांनी ही कबुली न्यायालयात दिली आहे. डबले यांनी न्यायालयाला सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांचा वकील म्हणून विधानसभा निवडणुकीचा फॉर्म भरण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. फॉर्म भरत असताना 2 गुन्ह्यांचा उल्लेख माझ्या चुकीने, लक्षात न आल्याने करण्यात आला नव्हता.

2014 सालच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात फडणवीस यांनी दोन गुन्ह्यांची माहिती न दिल्याचा आरोप करीत सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने देवेंद्र फडणवीस यांच्याविरूद्ध खटला चालवण्याचे आदेश दिले होते. फडणवीस यांनी उमेदवारीची कागदपत्रे भरताना फॉर्म 26 मध्ये 22 गुन्हाच्या उल्लेख केला होता. मात्र 2 खासगी गुन्ह्यांचा उल्लेख करण्याचे सुटले होते. नियमानुसार फडणवीस यांनी त्यांच्याविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या सगळ्या गुन्ह्यांची माहिती देणे बंधनकारक होते. त्यांनी असे न केल्याचा आरोप करत अ‍ॅड. सतीश उके यांनी फडणवीसांना न्यायालयात खेचले होते. फडणवीस यांनी लोकप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी अ‍ॅड. सतीश उके यांनी केली आहे. सदर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेत फडणवीस यांच्याविरूद्ध खटला चालवण्याची मंजुरी दिली होती. सध्या हा खटला नागपुरातील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरू आहे.

ॲड. सतीश उकेंनी दाखल केलेल्या याचिकेवर 6 मे 2023 रोजी सुनावणी झाली होती. सदर प्रकरणात साक्षीदार अ‍ॅड. उदय प्रभाकर डबले यांनी सरतपासणी घेण्यात आली. डबले यांनी सांगितले की 2014 साली आपल्यावर देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा निवडणूक फार्म भरण्याची जबाबदारी होती. यावेळी 26 नंबर फॉर्ममध्ये फडणवीस यांच्याविरूद्ध दाखल 22 गुन्ह्यांचा तपशील देण्यात आला मात्र यात 2 गुन्ह्यांच्या माहितीचा उल्लेख नव्हता. हे माझ्या चुकीमुळे, नजरचुकीने झाले असे डबले यांनी म्हटले आहे. या दोन गुन्ह्यांची माहिती मुद्दामहून लपविली नव्हती असे त्यांनी सांगितले. फडणवीस यांनी माझ्या सांगण्यावरून आणि माझ्यावर विश्वास ठेवून निवडणूक प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली आहे. माझा किंवा फडणवीस यांचा गुन्हे लपविण्याचा कुठलाही हेतू नव्हता असे ॲड. उदय डबले यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.