भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे संयुक्त सरकार ग्रामविकासाचा रथ अतिशय जोमाने पुढे नेईल – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर |
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या सदस्यांना भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत १२१ सरपंच आणि एक हजार ग्रामपंचायत सदस्य निवडून आले. या सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा चंद्रकांत पाटील यांनी सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांना मकरसंक्रांतीच्याही शुभेच्छा दिल्या.
यावेळी आपले मत व्यक्त करताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे संयुक्त सरकार ग्रामविकासाचा रथ अतिशय जोमाने पुढे नेईल. यासाठी नूतन सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घ्यावेत, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे, माजी आमदार सुरेशराव हळवणकर, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी मंत्री भरमुआण्णा पाटील, शिवाजीराव पाटील, अशोकराव माने, बाबासाहेब हिंदुराव पाटील, के.एस. आण्णा चौगले, मनोहर काटकर, राजाराम शिपुगडे, संभाजी पाटील, राहुल देसाई, मानसिंग उर्फ मुन्ना पाटील, अल्केश कांदळकर ,बाळ घोरपडे, एम. पी. पाटील, संजय पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.