बार्शी |
बार्शी शहरातील सुप्रसिद्ध अशा ‘मॉर्डन मशिनरी’चे मालक शहा यांच्या यतीन वल्लभदास शहा व त्यांची पत्नी कृती यतीन शहा या दांपत्याच्या हस्ते अन्नपूर्णा योजनेचे पूजन करण्यात आले. यावेळी सोनल अजय शहा, अजयभाई शहा, सीमा शहा, संदीप शहा, गोपालभाई शहा, जोशनाबेन शहा, मैत्री शहा व आकांक्षा शहा हेही अन्नपूर्णा योजनेच्या भोजन प्रसंगी उपस्थित होते. गेल्या ५० वर्षांपासून बार्शी शहरांमध्ये ते मशनरी चे सुप्रसिद्ध विक्रेते आहेत, कुटुंबीयांचा सामाजिक उपक्रमातही हिरिरीने सहभाग असतो.
मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली ७ वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय, अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण यतीन शहा व कृती या दाम्पत्यांने केले. मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात.