पुणे: महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करियर कट्टा’ अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स मंजूर झालेल्या महाविद्यालयांना प्रमाणपत्र व निधी वितरण सोहळ्यास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली.
यात युवकांना रोजगार देणारे शिक्षण घेण्याच्यादृष्टीने मार्गदर्शनाचे आणि सहाय्याचे काम ‘करियर कट्टा’ उपक्रमातून होत असल्याचे नमूद करून तरुणांना दिशा देण्यासाठी महाविद्यालयांनी नावीन्यपूर्ण उपक्रमात वाढ करावी, असे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे, राज्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
