Latest Marathi News

BREAKING NEWS

बार्शी | ‘बालाजी मोटार वर्ल्ड’ला प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांची सदिच्छा भेट

0

बार्शी |

मराठी कला विश्वास अनेक गाजलेले विनोदवीर आहेत मात्र काही विनोदवीर असे आहेत की ज्यांनी थेट प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता भाऊ कदम आपल्या विनोद बुद्धीने आणि विनोदाचे टाइमिंग साधत भाऊ कदम यांनी अनेकांची मन जिंकली. मराठी कला विश्वामध्ये त्यांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे.

विनोदाचा बादशहा म्हणून ओळख असणारे यांनी व सुप्रसिद्ध नाट्यनिर्माते राहुल भंडारी यांच्यासमवेत बार्शी शहरातील ‘बालाजी मोटार वर्ल्ड’ला आज दिनांक २७ एप्रिल रोजी भेट दिली. गेल्या अनेक वर्षापासून बार्शी शहरांमध्ये चार चाकी गाड्यांचे अत्याधुनिक गॅरेज म्हणजे बालाजी मोटार वर्ल्ड या ठिकाणी भेट देऊन भाऊ कदम व राहुल भंडारी यांनी त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी सदिच्छा दिल्या आहेत.

यावेळी प्रसिद्ध नाट्यनिर्मिते दिपक नलावडे, रोहन नलावडे (संचालक- मल्टीकोर क्रिएशन), अमित इंगोले (संचालक- मल्टीकोर क्रिएशन) उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.