Latest Marathi News

BREAKING NEWS

“बार्शी तिथं सरशी..!” अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेत ‘बार्शी सायकलिंग क्लबने रिले’ सांघिक प्रकारात प्रथम क्रमांक…

0

बार्शी |

‘द डेक्कन क्लीफ हँगर या ६४३ ६४३ कि.मी. च्या भारतातील नामांकित अल्ट्रा सायकलिंग स्पर्धेत ‘बार्शी सायकलिंग क्लबने रिले’ सांघिक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला व सर्वात जलद रीले रेस संघ २०२२ चा किताब मिळवत नवीन इतिहास रचला.

हि स्पर्धा शनिवारी दि. २६/११/२०२२ रोजी सकाळी ०७ः०० वाजता पुणे येथील केशवबाग, डी. पी. रोड येथून सुरू झाली. या स्पर्धेत भारतातील सहा राज्यातुन सायकल स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये पुणे ते बोगमालो-गोवा ६४३ कि.मी. हे अंतर ३१ तासात पुर्ण करायचे होते. तसेच ६४३ कि.मी. अंतरादरम्यान कात्रज, खंबटकी, पसरणी, महाबळेश्वर, मेढा, तवंडी, आंबोली अशे विविध घाट ओलांडत व त्या सोबत ऊन, वारा, हवा, पाऊस, व आद्रता ईत्यादींचा बाबींचा सामना करत, शारीरिक व मानसिक समतोल सांभाळत, झोपेवर नियंत्र ठेवत ३१ तासांत पूर्ण करण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते.

परंतु अजित मिरगणे, चंद्रकांत बारबोले व सुरज मुंढे यांनी ६४३ कि.मी. हे अंतर अवघ्या २४ तास ३ मिनिटांत यशस्वी रित्या पुर्ण करत प्रथम क्रमांक पटकावला. अक्षय जोशी, ओंकार थोपटे, अनिरुद्ध शिंदे, संजय सातपुते, लिना शेंडे, रोहन रेडकर, भालचंद्र मुरकुटे व रमेश पोवार यांनी आपले सर्वस्व पणाला लाऊन पूर्ण रेस च्या दरम्यान अजित मिरगणे, चंद्रकांत बारबोले व सुरज मुंढे यांना आवशक त्या बाबींची वेळोवेळी पूर्तता करत व रेसचे सर्व नियम काटेकोर पळत ‘रेस क्रू’ म्हणुन काम पाहिले. अजित मिरगणे, चंद्रकांत बारबोले व सुरज मुंढे या जिगरबाजांनी रिले सांघिक प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला व सर्वात जलद रीले रेस संघ २०२२ चा किताब मिळवत नवीन इतिहास रचला.

Leave A Reply

Your email address will not be published.