Latest Marathi News

BREAKING NEWS

“नागरिकांच्या गरजेनुसार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणार…!” – चंद्रकांतदादा पाटील

0

पुणे |

दिवसेंदिवस नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघांमध्ये फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासंदर्भातील तक्रारी लक्षात घेऊन फिजिओथेरपी शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. हे शिबीर टप्प्याटप्प्याने होत असून पहिल्या टप्प्यात नवसह्याद्रीतील ज्येष्ठांनी या शिबिराचा लाभ घेतला.

सहभागी ज्येष्ठांना त्यांच्या आरोग्याच्या तक्रारींनुसार तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे मोफत सल्ला तसंच तीन आठवड्यांसाठी व्यायाम प्रकारांचा एक कोर्स लिहून देण्यात आला. त्यानंतरही या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पुन्हा आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगामी काळात कोथरूडमधील इतर भागांतही अशा प्रकारे फिजिओथेरपी शिबीर आयोजित केलं जाणार असून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. असे आवहानही चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.