Latest Marathi News

BREAKING NEWS

बार्शी – खडकोणी बस वेळेत सोडण्याची मागणी,,
अनर्थ घडल्यास एस टी महामंडळ जबाबदार

0

बार्शी |

बार्शी आगळगाव मार्गे खडकोणी या सायंकाळी पाच वाजता सुटणाऱ्या बसने आगळगावतील लोकसेवा विद्यालयातून पाचवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी उंबर्गे, भानसळे , खडकोणी येथे जातात, यामध्ये विद्यार्थ्यांनीची संख्या जास्त आहे . परंतु गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार शाळेने व पालकांनी विनंती करून देखील सदर बस वेळेवर न येता आगळगावात आठ ते साडेआठच्या दरम्यान येते त्यामुळे विद्यार्थी घरी नऊ वाजता पोचतात. तोपर्यंत मुली बस स्टॉप वर असतात. बसच्या या अनियमित पणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर देखील परिणाम होत असून मुलींच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित झाला आहे. वारंवार आगार व्यवस्थापक श्रीमती मिसाळ मॅडम याना विनंती करून देखील मागील सहा महिन्यांपासून प्रश्न सुटलेला नाही. तरी सदर बस वेळेवर सोडून भविष्यातील अनर्थ टाळावा अशी विनंती शाळा व पालक यांचेकडून होत आहे, अन्यथा काही प्रकार घडल्यास एस टी महामंडळ याना जबाबदार धरले जाईल असे निवेदन पालकांनी आगार व्यवस्थापक याना दिले आहे.

चौकट
उंबर्गे, भानसळे खडकोणी येथून आगळगाव येथे अनेक ग्रामस्थ बँक, पोस्ट, दवाखाना व इतर कामासाठी येतात, अनेक मुली उच्च माध्यमिक शिक्षणासाठीही येतात , परंतु बसच्या अनियमित पणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून मुलींच्या असुरक्षित तेचा प्रश्न अतिशय गंभीर झाला असून पालक वर्ग प्रचंड चिंतेत आहे, अशातच काही गंभीर प्रश्न निर्माण झाल्यास एस टी महामंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनाही जबाबदार जाईल असा इशारा पालकांनी दिला आहे
श्री बालाजी विधाते, सरपंच- उंबर्गे
सौ मैनाबाई दशरथ कोथमिरे सरपंच – खडकोणी

Leave A Reply

Your email address will not be published.