मुंबई |
छत्रपती शिवाजी महाराजांवरून राज्यात पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. रावसाहेब दानवे यांनी शिवरायांचा उल्लेख एकेरी केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. रावसाहेब दानवे यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधानं केली जात आहे. सुरूवातीला राज्यपाल कोश्यारी, नंतर मंगलप्रभात लोढा, त्यानंतर प्रसाद लाड आणि आता थेट केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं असून शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे.
रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यासहित साताऱ्यात वातावरण पेटलं आहे. रविवारी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी पोवई नाक्यावरील शिवतीर्था जवळ रावसाहेब दानवे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप पक्षा विरोधात घोषणबाजी करत रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन केले आहे. यावेळी पोलिस आणि उदयनराजे समर्थकांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण पाहायलं मिळालं.