Latest Marathi News

BREAKING NEWS

“आधुनिक बहिणाबाई विमलताई माळी यांचा फुले-शाहू-आंबेडकर पुरस्काराने सन्मान…!”

0

चिखली |

आधुनिक बहिणाबाई म्हणून ओळख असणाऱ्या विमलताई माळी यांना नुकतेच फुले शाहू आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी साहित्य प्रांतात आपली शैलीदार छबी उमटवणाऱ्या बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या वतीने नुकत्याच संपन्न झालेल्या बहुजन साहित्य संमेलन-२०२२ मधे त्याचा सन्मान झाला.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याच्या एका छोट्याशा पाड्यासमान वस्तीवर जंगलभागात वास्तव्यात असून तसेच शिक्षणाचा गंध नसलेल्या व तरीही आपल्या अलौकिक प्रतिभेने सहाशेच्या वर कवितांचा डोंगर रचून वेगळाच इतिहास घडविणाऱ्या आणि त्यामुळेच आधुनिक बहिणाबाई म्हणून साहित्य विश्वात आपली छाप सिद्ध करणाऱ्या विमलताई माळी यांच्या या अविस्मरणीय कार्याची साहित्यिक दखल घेऊन बहुजन साहित्य संघाच्या वतीने दि. २०-११-२०२२ रोजी स्थानिक महाराजा अग्रसेन रिसॉर्ट येथील नयनरम्य परिसरात संपन्न झालेल्या या वर्षीच्या बहुजन साहित्य संमेलन-२०२२ मध्ये, त्यांना २०२१ चा बहुमानाचा काव्य क्षेत्रातील फुले-शाहू-आंबेडकर पुरस्कार देण्यात आला.

संमेलनाध्यक्ष तथा ज्येष्ठ समीक्षक मा. किरण शिवहर डोंगरदिवे – मेहेकर, उदघाटक व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ख्यातनाम विचारवंत डॉ. ऋषीकेश कांबळे – औरंगाबाद तथा स्वागताध्यक्ष या नात्याने उपस्थित असलेल्या आणि आपल्या उर्दू गझलांमुळे भारतीय जनमानसात घर करून असलेल्या सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक डॉ. गणेश गायकवाड – बुलढाणा या सर्वांच्या शुभ हस्ते तथा महाराष्ट्राच्या मा.उपमुख्यमंत्री महोदयांचे स्वीय-सचिव म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे असे मा.विद्याधर महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत ईतरही विद्वत्जनांच्या साक्षीने, प्रदान करून पुरस्कृत करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील समर्पित सामाजिक सेवा कार्यास्तव किरण डोंगरदिवे, डॉ. ऋषीकेश कांबळे, विमलताई वाणी, म्हसावद, आनंद महाजन, अमरावती, डॉ. मिलिंद दहीवले, नागपूर, डॉ. सावली राऊत, औरंगाबाद, डॉ. शिवचरण उज्जैनकर, मुक्ताईनगर, मा. संतराज आंबेकर, जाळीचा देव, डी. एन्. जाधव, औरंगाबाद, संघपाल सिरसाट, अकोला, डॉ. संघर्ष सावळे, मलकापूर, डॉ. नंदकुमार पालवे, पळसखेड सपकाळ, डॉ. राजकुमार कांकरिया, जळगाव तथा डॉ. सतीश तराळ, अमरावती ईत्यादी मान्यवरांना सुध्दा फुले-शाहू-आंबेडकर पुरस्काराने गौरविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.