Latest Marathi News

BREAKING NEWS

बार्शीतील शिक्षणशास्त्र विद्यालयात हॉलीबॉल स्पर्धा संपन्न ; ‘हा’ आहे विजेता संघ

0

बार्शी |

शिक्षणशात्र महाविद्यालय बार्शी येथे दिनांक ०९ व १० नोव्हेंबर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ
सोलापूर, आंतर महाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा (मुले) यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पी टी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अरुण देबडवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे हे होते.

तसेच या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक अरुणदादा बारबोले, शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ दिपक गुंड हे उपस्थित होते. कार्यक्रमाकची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर जगदाळे मामा यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.पी.एड. विभाग प्रमुख प्रा. डॉ. ए. जी. कांबळे यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.

यानंतर कार्यक्रमाचे उदघाटन श्री. पी. टी. पाटील व प्रमुख पाहुणे अरुण देबडवार यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे यांनी केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन स्पर्धा सचिव एम. पी. एड विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुरेश एम. लांडगे यांनी केले. व सूत्र संचालन प्रा.एस.एस. सुरवसे यांनी केले. या स्पर्धेमध्ये एकूण चोवीस संघांनी सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेची भाग्यपत्रिका तयार करते वेळी सर्व संघांचे संघ व्यवस्थापक, पात्रता समितीचे अध्यक्ष, सदस्य, व स्पर्धा निवड समितीचे अध्यक्ष, सदस्य हे सर्व उपस्थित होते. स्पर्धा समारोपसाठी श्री.शि.शि.प्र. मं, बार्शी खजिनदार जयकुमार बापूसाहेब शितोळे साहेब उपस्थित होते. विजेत्या संघास कै. नलिनी देशमुख यांच्या स्मरनार्थ ट्रॉफी, पुष्पगुछ व उपविजेत्या संघास पुष्पगुछ देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेच्या समारोप साठी स्पर्धा पात्रता समिती चे, सदस्य प्रा भुजबळ सर व प्रा डॉ राम नागटिळक सर तसेच निवड समिती अध्यक्ष प्रा डॉ सुरेश लांडगे व सदस्य प्रा डॉ मुस्ताक शेख सर, प्रा नंदकुमार देशपांडे उपस्थित होते. या स्पर्धा पर पाडण्यासाठी सोलापूर जिल्हा व्हॉलीबॉल संघटना चे पंच प्रशांत बिराजदार व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सदर स्पर्धेतील विजयी संघ-
1) प्रथम क्रमांक- संगमेश्वर कॉलेज सोलापूर.
2) द्वितीय क्रमांक उपविजेता संघ आर्टस् & कॉमर्स कॉलेज माढा.
3) तृतीय क्रमांक- के. बी.पी. कॉलेज पंढरपूर
4) चतुर्थ क्रमांक श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी.

Leave A Reply

Your email address will not be published.