उद्धव ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. गजानन कीर्तिकर यांनी काल सांयकाळी रविंद्र नाट्यमंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या उपस्थितीत गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मात्र असे असले तरी गजानन कीर्तिकरांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आणि यावरून खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. गजानन कीर्तिकारांच्या जाण्याने आमच्या शिवसेनेला कुठलाही फरक पडणार नाही, असे म्हणत अमोल कीर्तिकर कट्टर शिवसैनिक असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब, उद्धव ठाकरेंनी गजाजन कीर्तिकरांना काय नाही दिले. इतके वर्षे खासदारकी दिली. मंत्रिपद दिले. मात्र एवढे देऊनही त्यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या जाण्याने आमच्या शिवसेनेला काही धक्का वैगेरे बसला नाही. कीर्तिकर पक्षातून गेल्याने फार मोठी सळसळ झाली नाही. उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील, असं संजय राऊत म्हणाले.
तसेच निष्ठा म्हणजे काय? मी तर पक्षासाठी तुरुंगात जाऊन आलो. अजून काय निष्ठा हवी? असा सवालही राऊत यांनी केला. त्यांच्या जाण्याने आमच्या शिवसेनेला कुठलाही फरक पडणार नाही. आता त्यांनी पुढच्या निवडणुकीत विजयी होऊन दाखवावी असे आवाहन त्यांनी कीर्तिकर यांना दिले आहे.