बार्शी |
जपानस्थित कुबोटा ट्रॅक्टर्स चे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याचे वितरक के. टी. ट्रेक्टर्स च्या बार्शी येथील भव्य चार मजली अद्ययावत शोरूम (मुख्यालय) चे सोमवार दि.30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कुबोटा इंडिया चे मॅनेजिंग डायरेक्टर गुरुमितसिंग ग्रेवाल यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याची माहिती के टी ट्रॅक्टर्स चे सिएमडी संतोष ठोंबरे यांनी दिली.
लातूर रोडवर एस आर पेट्रोल पंपासमोर हे चार मजली वातानुकूलित भव्य फाईव्ह स्टार शोरूम बांधण्यात आले आहे. आशा प्रकारचे भव्य आणि अद्ययावत असे ट्रॅक्टर्स चे हे एकमेव शोरूम असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर सांगितले असल्याचे ठोंबरे म्हणाले.
२०१० साली मी के.टी. ट्रॅक्टर हे कुबोटा कंपनीचे शोरुम सुरु या व्यवसायात ग्राहकांचा विश्वास ,ट्रॅक्टर ची गुणवत्ता यामुळे दोन्ही जिल्ह्यातील २३ शाखांच्या माध्यमातून २०२२ मध्ये सुध्दा १२५२ ट्रॅक्टरची विक्रमी विक्री केली आहे़ तर मागील दहा वर्षात ७५०० पेक्षा जास्त ट्रॅक्टरची व्रिकी करुन एका नवीन मापदंड तयार केला आहे़ .

या उद्घाटन सोहळ्यासाठी आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री दिलीप सोपल, डिव्हीजनल हेड आशुतोष देशमुख, सागर मडला,समीर गडकरी, झोनल मॅनेजर सचिन राजमाने, येडेश्वरी शुगरचे चेअरमन बजरंग सोनवणे, सोलापूर जिल्हा ट्रॅक्टर असो चे अध्यक्ष अभिजीत पाटील, उस्मानाबाद जिल्हा ट्रॅक्टर असो चे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील,द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार, जिल्हा कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे, रिजनल सेल्स मॅनेजर जितेंद्र तांबारे,मॅनेजर स्पेअर पार्ट सतीश भालेराव ,राधाकिशन घोडके, टेरीटरी मॅनेजर ओंकार कारीमुंगी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमात शेतकरी बांधव व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ठोंबरे यांनी केले आहे.
के़.टी़ ट्रॅक्टर्स सलग तिसऱ्या वर्षी जगामध्ये ट्रॅक्टर विक्रीमध्ये एक नंबर
के़.टी़ ट्रॅक्टर्स बार्शी यांना २०२२ या वर्षात ग्राहक सेवा, सेवा समर्थन , ग्राहक समाधान, शाखाविस्तार, सक्षम मनुष्यबळ, विक्रमी ट्रॅक्टर विक्री ,बाजारातील कुबोटा टॅक्टरचा मार्केट शेअर आदी मापदंडामध्ये बाजी मारत उत्तमरीत्या कामकारत सलग तिसऱ्यांदा ट्रॅक्टर विक्रीमध्ये कुबोटा कंपनीच्या जगातील डिलरमध्ये क्रमांक एक मिळवला आहे़.