Latest Marathi News

BREAKING NEWS

“उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचा गौरव”

0

मुंबई |

भारताच्या संसदीय लोकशाही प्रणालीचा पाया हा निर्दोष मतदार यादी, मतदानाचा अधिकार वापरणारे जागरूक मतदार हा आहे. या कामी भारत निवडणूक आयोगाचे काम निरंतर सुरू असते. या कामी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अहमदनगर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी अभिनव संकल्पनासह नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत मतदार यादी अद्यायावतीकरणाचे काम पथदर्शी पद्धतीने केले.

याबद्दल महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना सन 2022 वर्षासाठीचा उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी पुरस्कार राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आज दिनांक 25 जानेवारी रोजी प्रदान करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.