पिंपरीच्या पोटनिवडणुकीच्या पूर्वतयारी संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न
पिंपरी पोटनिवडणूक हि बिनविरोध व्हावी असा स्वाभाविक सगळ्यांचा प्रयन्त – चंद्रकांत पाटील
पिंपरी |
पिंपरी चिंचवडचे सगळ्यांचे लाडके नेते स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घोषित झाली आहे. या पोटनिवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीची माहिती चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले कि, लक्ष्मण जगताप हे केवळ आमदारच नव्हे तर ते आम्हा सगळ्यांचे नेते होते. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील लोकांचे ते आधार होते. २७ फेब्रुवारी रोजी आधी मतदान होणार होते मात्र मतदानाचा टक्का वाढावा यासाठी २६ फेब्रुवारीचे नोटीफिकेशन आयोगाने जाहीर केले आहे. हि निवडनू बिनविरोध व्हावी असा स्वाभाविक सगळ्यांचा प्रयन्त असल्याचे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटले कि उमेदवार ठरवण्यासाठी हि बैठक नाही. उमेदवारी ठरवण्याची भाजपची प्रक्रिया ठरली आहे. कोअर कमिटीकडून पार्लमेंटरी बोर्ड यांच्याकडून केंद्रात निर्णय होत असतो. त्यामुळे दिल्लीतून उमेदवारी जाहीर केली जाईल. त्यामुळे हि बैठक केवळ व्यवस्था ठरवण्यासाठी झाली.कार्यालय कुठे असावं, सभा, प्रचार, आणि बैठका यासाठी हि बैठक झाली. तीन संघटनात्मक प्रमुख आम्ही निवडले आहे. बूथ च्या बाबतीत आम्ही अमोल थोरात यांची निवड केली आहे. दुसरी समिती हि व्यवस्थात्मक आहे यासाठी बापू काटे यांची निवड करण्यात आली आहे. तिसर म्हणजे सहयोगी पक्षांना सन्मान देणे यासाठी ,राजकीय समन्वय, घटक पक्षाशी चर्चा , बिनविरोध निवडणूक करण्यासाठी महेश लांडगे पिंपरीत काम पाहणार आहेत.