Latest Marathi News

BREAKING NEWS

पॅन कार्ड ही ३१ मार्चपूर्वी आधार कार्डशी लिंक करा ; नाहीतर हे होणार नुकसान

0

मुंबई |

तुम्ही ३१ मार्चपूर्वी आधार आणि पॅन लिंक केले तर तुम्ही अनेक फायदे घेऊ शकता. मात्र जर तुम्ही पॅनला आधारशी लिंक करण्यात अयशस्वी झालात, तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल तसेच तुम्हाला अनेक लाभांपासून वंचित राहावे लागेल.

सरकारने आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२३ ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करता येणार नाही. सध्या पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी १००० रुपये फिस द्यावी लागणार आहे.

आधार आणि पॅन लिंकिंगमुळे आयकर विभागाला सर्व व्यवहारांचे ऑडिट ट्रेल मिळते. जोपर्यंत तुमचा आधार-पॅन लिंक होत नाही तोपर्यंत ITR फाइलिंगला परवानगी दिली जाणार नाही. एकदा लिंक केल्यावर, ITR फाइल करणे सोपे होईल कारण पावती किंवा ई-सिग्नेचर सादर करण्याची गरज नाहीशी होईल.

आधार कार्डच्या वापरामुळे इतर कागदपत्रांची गरज बऱ्याच अंशी कमी झाली आहे. आधार कार्ड ओळखीचा पुरावा आणि पत्ता पुरावा या उद्देशाने देखील काम करते. लिंक केल्यानंतर ट्रांझेक्शन ट्रॅक केले जाऊ शकते. आधार-पॅन लिंकिंगमुळे फसवणुकीची समस्या दूर होईल आणि टॅक्स चोरीला लगाम बसेल.

Leave A Reply

Your email address will not be published.