मुंबई प्रतिनिधी । सध्या वॉरंटीमध्ये असलेले मोबाईल दुरुस्त करून देण्यास अनेक कंपन्या टाळाटाळ करताना दिसून येतात. त्यामुळे ग्राहकांना मोबाईल खरेदी केल्यानंतर निघणाऱ्या फॉल्टसाठी आगाऊपैसे द्यावे लागतात अशीच एक तक्रार मनसे टेलिकॉम सेनेकडे आल्यानंतर कंपनीला धडा शिकवून कोणतेही पैसे न भरता ग्राहकाचा मोबाईल दुरुस्त करून देण्यास ओप्पो सर्विस सेंटरला भाग पाडले.
प्रकरण असे की, संदीप कारबळ यांचा विजय सेल्स मधून घेतलेला ओप्पो कंपनीचा मोबाईल वॉरंटीमध्ये असताना सुद्धा कंपनीने दुरुस्त करण्यासाठी पैसे भरावे लागतील असे सांगितले. संदीप यांच्या मोबाईल डिस्पलेमध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यानंतर त्यांनी मोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये वॉरंटीमध्ये दुरुस्तीला दिला. ज्यावेळी सर्व्हिस सेंटरच्या कर्मचाऱ्यांने मोबाईल चेक केला त्यावेळी तुमचा मोबाईल वॉरंटीमध्ये दुरुस्त होईल असे सांगितले .
मात्र संदीप हे घरी आल्यानंतर त्यांना एका तासाने पुन्हा सर्व्हिस सेंटर मधून कॉल आला व वॉरंटीमध्ये दुरुस्त होणार नाही असे सांगण्यात आले त्यानंतर संदीप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनसे टेलिकॉम सेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधला व कंपनीने कशा प्रकारे आपली फसवणूक केली याबद्दल माहिती दिली.
राहुल पाटील यांनी थेट कंपनीला मेल करून लवकरात लवकर कोणताही देय न आकारता मोबाईल दुरुस्त करून देण्यात यावा असे पत्र धाडले त्यानंतर आज सर्विस सेंटरमधून संदीप यांना कॉल करण्यात आला व कोणतेही देय न आकारता मोबाईल दुरुस्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले याबद्दल संदीप यांनी टेलिकॉम सेना अध्यक्ष सतीश रत्नाकर नारकर आणि जिलाध्यक्ष राहुल पाटील यांचे आभार मानले आहेत.
शरद पवार म्हणतायत अजितदादा आमचे नेते तर बच्चू कडू म्हणतायत आता…..
शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर ठाकरे गटाच्या नेत्याच स्पष्टच विधान