पालनपुर |
गुजरात निवडणुकीतील पालनपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार अनिकेतभाई ठाकर यांच्या प्रचारार्थ पालनपूर शहरात प्रचार सभेला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना चंद्रकांत दादा म्हणाले की पाटीदार समाज आणि कोल्हापूर यांची जुने नाते आहे, अनेक वर्षापासून ऋणानुबंध ही आहेत.
पालनपुर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार अनिकेत भाई ठाकर यांना जनतेतून मोठा पाठिंबा मिळत आहे असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले, पाटीदार समाज, माळी समाज व गुजराती बांधव हे अनिकेत भाई ठाकर यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे, सभेला लोकांचा उत्साह व पाठिंबा पाहून अनिकेतभाई यांचा विजय निश्चित आहे असे प्रतिपादनही त्यांनी केले. तरी नागरिकांनी त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहनही चंद्रकांत दादांनी केले.
यावेळी वेदांत स्वामीजी, हर्षद भाई माली, शांतिलाल पढ़ियार, महेंद्रभाईं, दशरथसिंह यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.