Latest Marathi News

BREAKING NEWS

डोलताशा पथकांच्या समस्यांवर पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढू, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील

0

पुणे: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणरायाच्या आगमनाची शोभा वाढविणारी ढोल पथक सज्ज होत आहेत. त्यांचे सराव देखील सुरू झाले आहेत. अशाच पुण्यातील नमुवि येथील ढोल ताशा पथक महासंघाच्या सरावाचा शुभारंभ आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा केला. गणेशोत्सव जवळ येत असताना पुणे शहरात पारंपरिक ढोल-ताशा पथकांचे सराव सर्वच ठिकाणी सुरू झाले असताना अनेक ठिकाणी या सरावाला परवानगी मिळत नसल्याने संयोजकांना आणि वादकांना अडचणी येत असल्याचे पाटील यांच्या निदर्शनास आणून देताच, या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करु, तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी घालण्यात येणाऱ्या बंधनां संदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढू, अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, ढोल ताशा महासंघाचे प्रमुख पराग ठाकूर यांच्यासह ढोल ताशा महासंघाचे पदाधिकारी आणि वादक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.