मुंबई |
केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये पद्मभूषण, पद्मश्री आणि पद्मभूषण अशा 3 पुरस्कारांचा समावेश असतो. केंद्र सरकारने एकूण 106 जणांची पद्म पुरस्कारांसाठी निवड केली आहे. यामध्ये सर्वाधिक 91 पद्मश्री, 9 पद्मभूषण आणि 6 जणांची निवड ही पद्मविभूषण पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून एकूण 12 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री रवीना टंडन आणि प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन या दिग्गजांचा समावेश आहे. समाजसेवा, क्रीडा, कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, उद्योग या आणि यासारख्या क्षेत्रात अनन्यसाधारण आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात.
२०२३ पद्म पुरस्कारांची घोषणा
पद्मविभूषण
१. झाकीर हुसेन
२. मुलायमसिंह यादव (मरणोत्तर)
३. एस एम कृष्णा (मरणोत्तर)
४. बालकृष्ण दोशी ( मरणोत्तर)
५. श्रीनिवास वर्धन
६. दिलीप महालनोबिस
पद्मभूषण
१. सुमन कल्याणपूर (संगीत)
२. कुमार मंगलम बिर्ला ( उद्योग)
३. दीपक धार (विज्ञान-अभियांत्रिकी)
पद्मश्री
१. राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर)
२. भिकू रामजी इदाते (सामाजिक)
३. प्रभाकर मांडे
४. गजानन माने
५. रमेश पतंगे
६. कुमी वाडिया
७. रविना टंडन
८. परशुराम खुणे
असे मिळून ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण, ९१ पद्मश्री असे एकूण १०६ पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे
महाराष्ट्रातील पुरस्कारनिहाय मानकरी
पद्मश्री
राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), परशुराम खुणे, भिकू रामजी इदाते, प्रभाकर मांडे, रमेश पतंगे, गजानन माने, रविना टंडन आणि कुमी वाडिया.
पद्मभूषण
सुमन कल्याणपुर, दीपक धार आणि कुमार मंगलम बिर्ला.
पद्मविभूषण
झाकीर हुसेन (तबलावादक)