पत्रकार दिनानिमित्त महापुरुषांना अभिवादन अन्ं भाऊना श्रध्दांजली अर्पण – डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा उपक्रम
- दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना पत्रकारांतर्फे श्रध्दांजली अर्पण
पिंपरी |
पिंपरी चिंचवड डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला तर भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना सर्व पत्रकारांनी भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण केली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहआयुक्त आशादेवी दुर्गूडे, विशेष कार्यकारी अधिकारी किरण गायकवाड यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अनिल वडघुले, विकास शिंदे, गणेश हुंबे, मंगेश सोनटक्के, प्रशांत साळुंखे, प्रविण शिर्के, गणेश मोरे, लिना माने, राम वाघमारे आदी पत्रकार उपस्थित होते. तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेतर्फे महापालिकेच्या निराधार सावली केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना खाऊचे वाटप करण्यात आले. सावली केंद्राची पत्रकारांनी पाहणी करत ज्येष्ठांच्या तब्येची विचारपूस करण्यात आली. याप्रसंगी सावली केंद्राचे एम. हुसेन उपस्थित होते.