Latest Marathi News

BREAKING NEWS

ज्यांची भीती नसते, त्यांना…. संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जानेवारी महिन्याच्या अखेरीस मुंबईत सभा घेणार असल्याचं समोर आले आहे. शिवसेना भवनासमोर ही सभा होईल असं बोललं जात आहे. मात्र त्यावरून आता शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. राज ठाकरे हे भाजपा पुरस्कृत आहेत असाही टोला राऊतांनी राज यांना लगावला आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं की, शिवसेना भवनाविषयी सगळ्यांनाच प्रेम आहे. सगळ्यांचा आत्मा तिथे अडकला आहे. सभा घ्यायची असेल तर घेऊ द्या. सभा घ्यायला कुणाला बंदी आहे का? आम्ही रोज शिवतीर्थावर त्यांच्या घरासमोर सभा घेतो. सभेला महापालिकेने परवानगी दिली तर घेऊ द्या. आणि सरकार त्यांचे आहे म्हटल्यावर परवानगी देणारच आहे. तेसुद्धा भाजपा पुरस्कृत आहेत असं त्यांनी सांगितले.

पुढे बोलतान राऊत म्हणाले की, त्याचसोबत सभा घेण्यासाठी परवानगी आम्हाला मिळत नाही. आम्हाला संघर्ष करावा लागतो. कारण आमची भीती आहे. ज्यांची भीती सत्ताधाऱ्यांना नसते त्यांना कुठेही लघुशंका करण्याची परवानगी मिळते अशा शब्दात खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.