Latest Marathi News

BREAKING NEWS

पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्याची हत्या

0

मुंबई |

त्रयस्थ व्यक्तीकरवी विवाहितेकडे शरीरसुखाची मागणी करणे एका तरुणाच्या जिवावर बेतले आहे. पत्नीने ही बाब पतीला सांगितल्यानंतर संतापलेल्या पती व त्याच्या मित्राने त्या तरुणाची हत्या केल्याची घटना वरळी येथे घडली.
पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.

रंजन याने त्रयस्थ व्यक्तीकरवी आरोपीच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली. ही बाब पत्नीने सचिनला सांगितली. हे ऐकून सचिनच्या तळपायाची आग मस्तकात गेली. दरम्यान, रंजन हा विनस गल्लीत उभा असताना सचिन तेथे गेला आणि त्याने पत्नीकडे केलेल्या मागणीबाबत जाब विचारला. त्यावेळी झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन रंजनला सिमेंटच्या पेवर ब्लॉकवर ढकलून दिले. तसेच भावेश साळवे याने हातामध्ये दगड घेऊन रंजनच्या डोक्यात मारला. परिणामी रंजन निपचित पडला. त्याला तशाच अवस्थेत सोडून आरोपी निघून गेले.

विनस गल्लीत एक तरुण बेशुद्धावस्थेत पडला असल्याची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्या तरुणाला तत्काळ नायर रुग्णालयात नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला दाखलपूर्व मृत घोषित केले. त्यामुळे वरळी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. परंतु मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यावर शरीरात अंतर्गत जखमा असल्याचे व मृत्यू नैसर्गिक नसल्याचे स्पष्ट झाले. मग पोलिसांनी लगेच तपास सुरू करून रंजनला मारणाऱया सचिन आणि भावेश यांना अटक केली, अशी माहिती वरळी पोलिसांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.