मुंबई : किंगखान अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान अंमली पदार्थांप्रकरणी (ड्रग्ज) एसीबीचे माजी अधिकारी समिर वानखेडे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तसेच आता त्यांनी आर्यनच्या कुटुंबाकडून किती पैशांची मागणी केली होती याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आर्यन खानला अंमली पदार्थांप्रकरणी सोडण्यासाठी तत्कालीन एनसीबीचे झोनल डारेक्टर समिर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची मागणी केली होती. एवढी मोठी रक्कम देण्यास आर्यनचे कुटुंबीय तयार नसल्याने यात वाटाघाटी करण्यात आली आणि ही रक्काम १८ कोटी करण्यात आली. रक्कम ठरल्यावर त्यांना आधी टोकन देण्यात आले. टोकनची रक्कम ५० लाख रुपये होती.
या आधी वानखेडे यांच्या मुंबई येथील घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. वानखेडे यांच्या गोरेगाव पश्चिमेकडील इम्पेरियल हाइट्स या इमारतीच्या सी विंगमधील घरी सीबीआयची टीम १२ मे रोजी पोहचली होती. या टीममध्ये ३ अधिकारी होते. सीबीआयची ही चौकशी पहाटे ५ पर्यंत सुरु राहिली.