कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला पहिला धक्का बसला आहे. काँग्रेसचे टी रघुमूर्ती हे पहिले विजयी ठरले आहेत. चालगिरामधून त्यांनी १६ हजार मतांनी विजय मिळवला आहे. दरम्यान, निकालाच्या या सर्व गोंधळात काँग्रेसने५ स्टार हॉटेलसह ५० रुम्स बुक केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने बंगळुरूमधील ५ स्टार हिल्टन हॉटेलमध्ये ५० खोल्या बुक केल्या आहेत. विजयी आमदारांना रात्री ८ वाजेपर्यंत हॉटेलमध्ये पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, कर्नाटकातील तीन हवाई पट्टीवर काँग्रेसने छोटी विमाने तैनात केली होती.
प्रत्येक पट्टीवर पक्षाच्या राज्यस्तरीय जबाबदार नेत्याची तैनाती करण्यात आली. त्या भागातील विजयी आमदारांना घेऊन एक विमान बेंगळुरूला येईल. तर फक्त जवळच्या आमदारांनाच रस्त्याने आणलं जाईल. उद्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे.