लातूर |
आंबेडकरी चळवळ व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल रामराव गवळी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रामराव गवळी यांच्या पत्रकारितेतील अनन्यसाधारण योगदानासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. एस. एम. जोशी फोंडेशन, पुणे आणि भारतीय भटक्या – विमुक्त जमाती विकास संघटनेतर्फे ३० एप्रिल रोजी राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आयोजित सामाजिक न्याय व सलोखा परिषदेत आंबेडकरी पत्रकारिता व चळवळीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल रामराव गवळी यांचा माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या हस्ते सपत्नीक सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. माजी आमदार पंडितराव देशमुख, डाॅ. अनिल जायभाये, सुधा गवळी, अयानुल अत्तार, प्रा. सुशिला मोराळे, रामराजे अत्राम व साथी सुभाष लोमटे दिसत आहेत.