Latest Marathi News

BREAKING NEWS

मोठी बातमी : सचिन तेंडुलकरची मोठी फसवणूक; मुंबई क्राईम ब्रँचकडे तक्रार

0

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर सध्या मुंबई इंडियन्सच्या सामन्यांमध्ये उपस्थित राहून क्रिकेट सामन्यांचा आनंद घेत आहेत. याच दरम्यान एक मोठी माहिती समोर येत आहे. सचिन तेंडुलकरने मुंबई गुन्हे विभागात गुन्हा दाखल केला आहे. याची माहिती खुद्द सचिन तेंडुलकर यानेच दिली आहे. सचिन तेंडुलकरने गुरुवारी तक्रार नोंदवली. मुंबई क्राइम ब्रँचच्या सायबर सेलमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार खोट्या आणि बनावट जाहिरातींमध्ये सचिनचे नाव वापरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सचिनच्या नावाचा वापर करून लोकांची फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. इंटरनेटवरील अनेक बनावट जाहिरातींमध्ये नावासह फोटो आणि आवाजाचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याच्या नावाचा वापर करून लोकांची फसवणूक केली जात आहे.

रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे त्या बनावट जाहिरातींमध्ये असेही म्हटले जात आहे की जर कोणी त्यांचे प्रॉडक्ट खरेदी केले तर त्यांना सचिन तेंडुलकरची स्वाक्षरी असलेली जर्सी दिली जाईल. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने तपास सुरू केला आहे. एक जाहिरात पाहिली होती जी तेल कंपनीची आहे, ज्यामध्ये सचिन तेंडुलकरचा फोटो लावला आहे आणि त्यासोबत क्रिकेटर सचिनने या उत्पादनाची शिफारस केली असल्याचे लिहिले आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर या जाहिराती पाहण्यात आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.