मुंबई |
रेशीम संचालनाचा महाराष्ट्रात ब्रँड तयार करण्याच्या व रिक्त पदे तातडीने भरण्याच्या सूचना वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ३० नोव्हेंबर रोजी मुंबई येथील चंद्रकांत दादा पाटील यांच्या निवासस्थानी सिंहगड निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील रेशीम संचालनाचा ब्रँड तयार झाला पाहिजे यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले, व या विभागात असणारी रिक्त पदे ही लवकरात लवकर भरण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्या आहेत.

रेशीम शेती हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय ठरत आहे. त्याचमुळे राज्याच्या अनेक भागात रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढती आहे, त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा असेही चंद्रकांत दादा पाटील म्हणाले. रेशीम शेतीला राज्यभरात चांगला प्रतिसाद असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा ही होतो असेही ते म्हणाले, यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे सचिव श्री. वीरेंद्रसिंग,आयुक्त पी.शिवशंकर तसंच रेशीम संचालनालयाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.