Latest Marathi News

BREAKING NEWS

सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या नूतन अध्यक्षपदी चेतन नरोटे यांची निवड

0

सोलापूर |

सोलापुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांनी त्यांची मुदत संपल्यामुळे दिनांक 05 डिसेम्बर 2022 रोजी राजीनामा दिला होता.

त्यामुळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या शिफ़ारसीनुसार सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या नूतन अध्यक्षपदी चेतन नरोटे यांची निवड करण्यात आली आहे.

चेतन नरोटे निवडीचे पत्र आज रोजी टिळक भवन मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह माजी अध्यक्ष प्रकाश वाले व इतर नेतेमंडळीनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी मा. नगरसेवक विनोद भोसले, सुशील बंदपट्टे, राहुल वर्धा, दीनानाथ शेळके यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.