करमाळा |
पुण्याला जोडणारा डिकसळ पूला काही भाग कोसळला असे समजताच श्री.नारायण(आबा)पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.पुलाचा काही भाग कोसळला असे समजताच पश्चिम भागातील जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले.या पुलाच्या कामासाठी पश्चिम भागातील जनतेने वारंवार मागणी केली होती.परंतु आजतगायत या कामाला मंजुरी मिळाली नाही किंवा प्रत्यक्षात कोणताच ठोस निर्णय घेता आला नाही.
श्री.नारायण(आबा)पाटील यांनी प्रत्यक्ष पुलावर भेट देऊन समस्या जाणून घेतल्या त्यावेळी बांधकाम विभागाचे आभियंता श्री.उबाळे साहेब,वाघा रावसाहेब,जिंती बिटचे पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा करून कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्याची प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती केली. त्यावेळी पश्चिम भागातील जनतेने आपण मुख्यमंत्री यांच्याकडे या पुलाच्या कामासाठी मागणी करावी अशी विनंती केली.त्यावेळी आबांनी सांगितले 2017-2018 सालीच या पुलाचे फाउंडेशन चेकिंग चे काम झाले होते.पुढील कामासाठी मी वारंवार प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.