कोल्हापूर |
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत १२१ सरपंच आणि एक हजार ग्रामपंचायत सदस्य निवडून आले. या सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करुन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे संयुक्त सरकार ग्रामविकासाचा रथ अतिशय जोमाने पुढे नेईल. यासाठी नूतन सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घ्यावेत असे आवाहन मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी यानिमित्ताने केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे, माजी आमदार सुरेशराव हळवणकर, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी मंत्री भरमुआण्णा पाटील, शिवाजीराव पाटील, अशोकराव माने, बाबासाहेब हिंदुराव पाटील, के.एस. आण्णा चौगले, मनोहर काटकर, राजाराम शिपुगडे, संभाजी पाटील, राहुल देसाई, मानसिंग उर्फ मुन्ना पाटील, अल्केश कांदळकर ,बाळ घोरपडे, एम. पी. पाटील, संजय पाटील यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.