Latest Marathi News

BREAKING NEWS

“पांडुरंग डेपोचे योगेश उपळकर दाम्पत्याने केले अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन!”

0

बार्शी

बार्शी शहरातील महाराष्ट्र विद्यालय येथे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे योगेश सुभाष उपळकर व त्यांच्या पत्नी शालिनी योगेश उपळकर यांच्या हस्ते २८ मार्च रोजी अन्नपूर्णा महाप्रसादाची पूजन करण्यात आले. उपळकर कुटुंबीयांच्या मालकीचे बार्शी शहरातील सुप्रसिद्ध असे ‘पांडुरंग बुक डेपो’ आहे, गेल्या अनेक वर्षापासून पुस्तकाच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय त्यांचे कुटुंबीय करतात. उपळकर कुटुंबीयांचा अनेक सामाजिक उपक्रमातही सहभाग असतो.

मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली सात वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय. मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यामध्ये स्वच्छता मोहीम आरोग्य शिबिरे व थोरामोठ्याची व्याख्याने आयोजित केली जातात. मातृभूमी प्रतिष्ठानने महाराष्ट्रामध्ये वेगळा लौकिक मिळवला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.