सोलापूर |
सोलापुरात शिवचरित्र व्याख्याते डॉ.शिवरत्न शेटे, पत्रकारितेचे नवे तंत्र, कोणत्याही विषयाच्या मुळाशी पोहचून त्या विषयाची सकारात्मक उकल करण्याचे उपजत कौशल्य आणि आपल्या सामाजिक भानाच्या बळावर महाराष्ट्राच्या पत्रकारितेत इतिहास घडविणारे एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी, सोलापूरच्या येस न्यूज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून राज्याच्या डिजिटल मिडिया क्षेत्रात एक “यशस्वी मॉडेल” म्हणून नावारुपास आणणारे डॅशिंग संपादक शिवाजी सुरवसे आणि ख्यातनाम फर्डे वक्ते, ज्येष्ठ पत्रकार आणि माझ्या “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” पुस्तकाचे प्रकाशक प्रगती प्रकाशनचे संचालक दत्ता थोरे असे चार यार.. अचानक बालाजी सरोवर येथे एकत्र जमलो.. चौफेर गप्पा झाल्या.. दत्ता थोरेंच्या हस्ते राहुल कुलकर्णी यांना माझे पुस्तक भेट दिले.
-राजा माने,
संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ,
संस्थापक अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.