Latest Marathi News

BREAKING NEWS

ईडी आणि सीबीआय सत्तेत असलेल्या मोदी सरकारच्या दबावाखाली काम करते – संजय राऊत

0

राहुल गांधी यांच्या मुद्दयावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी [पुन्हा एकदा सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जो सत्ताधाऱ्यांचा (मोदी सरकार )राजकीय विरोधक आहे त्यांच्या चूका शोधून काढल्या जातात.तसेच नसलेल्या चूका त्यांना हवा देऊन मोठे केले जाते. त्यानंतर सरकार पाडले जाते, पक्ष फोडला जातो हे लपून राहिले नाही आता उघड आहे. सूड आणि बदल्याचे राजकारण हाच नरेंद्र मोदींचा अमृतकाळ आहे अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत चांगलाच समाचार घेतला. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली होती,

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सक्तवसुली संचनालया (ईडी ) आणि सीबीआयसारख्या केंद्राच्या संस्था सत्तेत असलेल्या पक्षाच्या दबावाखाली काम करतात. देशातील सर्वच तपास यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या बटीक आणि गुलाम झाल्यात. भ्रष्टाचार हा एकाच पक्षाचा नसतो. जो सत्तेवर असतो त्याचा भ्रष्टाचार सर्वाधिक असतो. निवडणूक आयोग हा एकतर्फी काम करतोय. निवडणूक आयोग हा लोकशाहीचा कणा आहे तो कणाही मोदी सरकारने मोडून काढला असा आरोप त्यांनी केला.

तसेच EVM शंका उपस्थित करताना राऊत म्हणाले की, कालच्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बैठकीत सर्वच विरोधी पक्षाची बैठक झाली. निवडणूक आयोगाची लफंगेगिरी यावर चर्चा केली जाते. ईव्हीएमची भूमिका आजची नाही. ईव्हीएमबाबत पहिला आवाज भाजपाने उचलला होता. सोमय्या आणि सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पुराव्यासकट हे समोर आणले होते. बाळासाहेबांसमोरच सोमय्यांनी EVM हॅक कसे केले जाते हे दाखवले आहे. याच पुराव्याचा आधार घेत आम्ही पुढे रणनीती आखणार आहोत असंही राऊतांनी म्हटलं.

Leave A Reply

Your email address will not be published.