Latest Marathi News

BREAKING NEWS

चित्राचे शिर्षक- विस्मरण ; बार्शीचे सुपुत्र मिलिंद वसंतराव उटगीकर यांनी साकारलेली कलाकृती!

0

बार्शी |

मूळचे बार्शी येथील असणारे सर्जनशील व्यक्तिमत्व मिलिंद वसंतराव उटगीकर यांनी अनेक अर्थपूर्ण अशा डिजिटल पेंटिंग साकारल्या आहेत. सदर चित्र मोबाईल वरिल फोटोवर रेखाटलेले हे मिक्स मेडीया मधिल आर्टवर्क आहे.

चित्राचे शिर्षक- विस्मरण (Dementia)
मनाने विणलेले स्नेहाचे, प्रेमाचे खतपाणी घातलेले, जोपासलेले हे मेंदूतले धागे शुष्क होऊ लागतात. मज्जातंतूतील कनेक्शन तुटू लागतात आणि आपण म्हणतो विस्मरणाचा रोग जडला. इंग्लिश मधे Dementia!

त्यांनी फोटोग्राफी, डिजिटल आर्टसाठी व पारंपरिक कलेसाठी विशेष ब्लॉगही सुरू केलेले आहे. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयासाठी दुसरा आहे. डिजिटल आर्ट व इतर लिखानासाठी ते स्वतः अपलोड करून देणार असल्याची माहिती उटगीकर यांनी दिली. मराठी हिंदी इंग्रजी अशा तिन्ही माध्यमातील नामांकित दैनिकातून त्यांनी ३० वर्ष वृत्तपत्रसृष्टीची सेवा करून ते सध्या सेवानिवृत्त आहेत.

उटगीकर हे राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय विषयावरील ब्लॉगर असून त्यांच्या वेबसाईटची लिंक खाली दिली आहे.
https://newsintercontinentalmu.in /लिखाणासाठी ,https://artyexpressions.art.blog हा दुसरा ब्लॉग , आर्ट्स. पूर्ण वेळ वाचन,कविता, लिखाण, चित्रकला, फेसबुक, ईन्स्टाग्राम या साठी देतात, आपल्याकलाकृती अथवा खाली मेलवर पाठवावे.
मेल-newsintercontinental29@gmail.com
मोबाईल: 8805007076

Leave A Reply

Your email address will not be published.