घरात खायला काही नाही, आम्हाला राजा व्हायचे आहे…. चंद्रकांत पाटील यांचे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्यावर टीकास्त्र
मुंबई |
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्ययाबाबत अशोभनीय वक्तव्य केले आहे. न्यूयॉर्क मध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली. यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज राज्यभर ठिकठिकाणी भुट्टो यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यांनी देखील बिलावल भुट्टो यांना खडे बोल सुनावले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे कि, घरात खायला काही नाही… आम्हाला राजा व्हायचे आहे. पाकिस्तानची अवस्था नेहमीच अशीच आहे. म्हणूनच वाईट परिस्थिती लपवण्यासाठी भारताला नेहमीच लक्ष्य केले जाते. आमचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलताना बिलावल भुट्टो झरदारी यांनी निर्लज्जपणाची सीमा ओलांडली आहे. थोडी तरी लाज बाळगा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
बिलावल भुट्टो संयुक्त राष्ट्रांच्या बैठकांसाठी उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत. त्यांनी असे म्हटले कि मोदी पंतप्रधान होईपर्यंत त्यांच्यावर अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी होती. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परराष्ट्रमंत्री आहेत, अशी टीका भुट्टो यांनी केली आहे.
बिलावल भुट्टो यांच्या या विधानाचा निषेध म्हणून राज्यात भाजपा कार्यकर्ते १२०० ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. सर्व शहरे, जिल्हे व तालुक्यांच्या ठिकाणी आंदोलने होत आहेत. बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळून कार्यकर्ते संताप व्यक्त करण्यात येत आहे.