Latest Marathi News

BREAKING NEWS

“अवघ्या ५ रुपयात कापडी पिशवी उपलब्ध करून देणाऱ्या मशीनचे चंद्रकांत दादाच्या हस्ते लोकार्पण”

0

पुणे |

पुण्यातील कोथरूड मतदार संघातील कर्वेनगर येथे पाच रुपयात कापडी पिशव्या उपलब्ध करून देणाऱ्या मशीनचे आज १७ डिसेंबर रोजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

या मशीनमुळे प्लास्टिक वापरावर आपोआप आळा बसणार असून बचत गटातील महिलांना रोजगारची संधीही उपलब्ध होणार आहे. चंद्रकांत दादा हे मतदारसंघात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात, मग फिरते वाचनालय असो वा विद्यार्थ्यासाठी किल्ले बांधणी स्पर्धा यासह अनेक माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांशी संपर्कासह नागरिकांच्या असतात. कोथरूड मतदारसंघांमध्ये भविष्यात अशा प्रकारच्या १०० पेक्षा जास्त मशीन सुरू करण्याची ग्वाही यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

या मशीनमुळे पर्यावरण संरक्षणासह रोजगार निर्मिती होणार आहे, ‘कापडी पिशव्याचा वापर करा, पर्यावरण वाचवा!’ असा संदेशही त्या कापडी पिशवीच्या मशीनवर आहे. या लोकार्पणप्रसंगी कोथरूड भागातील ग्रामस्थ व भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.