पुणे |
सह्याद्रीच्या कुशीतल्या मावळ तालुक्यातील भोयरे ग्रामस्थांशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी संवाद साधला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या योजनांची माहिती त्यांना दिली. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून विकासाभिमुख कार्यक्रम राबवत राहू असेही चंद्रकांत दादा म्हणाले. महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका चालू आहेत, या निवडणुकीमध्ये योग्य तो उमेदवार निवडून द्या असे आवहानही चंद्रकांतदादा यांनी केले.

‘हर घर नल से पानी’ योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी कामं सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य सरकारही विविध योजनांतून ग्रामविकासाला प्राधान्य देत आहेत. गावांच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही या निमित्तानं दिली. सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून भाजप व्यापक काम करत आहे असेही चंद्रकांत दादा म्हणाले.