Latest Marathi News

BREAKING NEWS

‘संतुलन बिघडलेल्या लोकांबद्दल’ सुषमा अंधारेंचा गुणरत्न सदावर्तेंना टोला

0

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांनी पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत. या पार्श्‍वभूमीवर विविध संघटनांनी पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यामध्ये शहरातील विविध संघटना आणि मान्यवर व्यक्ती यांनी पाठिंबा दिला असून मोर्चामध्येही सहभागी होणार आहे.

पुण्यातील बंद आणि हा मोर्चा बेकायदेशीर असल्याचं म्हणत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती आता या टीकेवर सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माध्यमांशी बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘संतुलन बिघडलेल्या लोकांबद्दल बोलण्यात अर्थ नाही असा टोला त्यांनी लगावला होता.

त्या माणसाला नवणीत राणा मातोश्रीवर घुसण्याच्या प्रयत्न करतात, ते कायदेशीर वाटतं, एसटी कामगार ‘सिल्वर ओक’वर घुसण्याचा प्रयत्न करतात, ते कायदेशीर वाटतं. मात्र, आम्ही सनदशीर मार्गाने आमचा निषेध नोंदवत असताना ते बेकायदेशीर वाटतं. यावरून सदावर्तेंचा आणि कायद्याचा किती संबंध असेल, हे लक्षात येईल. ईश्वर त्यांना क्षमा करो”, असं प्रत्युत्तर सुषमा अंधारे यांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.