पुणे |
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड मध्ये निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते, कीर्तनातून समाज प्रबोधन यासाठी इंदुरीकर महाराज ओळखले जातात, या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी पूर्णानगर येथे केले होते.

यावेळी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे, गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते. महाराष्ट्रातील भाजपच्या जडणघडणीत गोपीनाथराव मुंडे यांची भूमिका महत्त्वपूर्ण होती असेही चंद्रकांत दादा म्हणाले. या कीर्तन सेवा कार्यक्रमाला उपस्थित राहून चंद्रकांत दादांनी सर्वांना शुभेच्छा ही दिल्या. यावेळी पिंपरी चिंचवड मधील भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.