Latest Marathi News

BREAKING NEWS

“अखिल भारतीय पोलिस रेसलिंग क्‍लस्टर स्पर्धेचे बक्षीस वितरण उपमुख्यमंत्री फडणवीस व चंद्रकांतदादाच्या हस्ते संपन्न”

0

पुणे |

पोलिसांच्या स्पर्धेवेळीच पोलिसांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचे आम्ही निश्‍चित केले होते. मात्र, मध्यंतरी आमचे सरकार नसल्याने आणि कोरोनामुळे ते काम थांबले. या कामाला आता गती देणार असून पुण्यात पोलिसांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक, सोई सुविधा असणारे क्रीडा संकुल व वसतिगृह उभारण्यात येईल, असे आश्‍वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र पोलिस दलाच्यावतीने रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक दोन येथे ‘अखिल भारतीय पोलिस रेसलिंग क्‍लस्टर स्पर्धा २०२२’ चे आयोजन केले गेले होते, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत झाला. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना देवेंद्रजींच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडुंनी उल्लेखनीय कामगिरी केली.‌

कोरोनयावेळी राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंग, राज्य राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, राज्य राखीवचे पोलीस उपमहानिरीक्षक दीपक साकोरे, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.