Latest Marathi News

BREAKING NEWS

बॉलीवूडवर पुन्हा टॉलीवूड भारी, थलपथी विजयच्या ‘वरिसु’ने ३ दिवसांतच कमवले तब्बल ‘इतके’ कोटी

0

थलपथी विजयच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वरीसू’ हा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, सिनेरसिकांचा या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.’वरीसू’ मध्ये नेहमीप्रमाणे विजय त्याच्या डॅशिंग स्टाईलमध्ये दिसत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक बड्या चित्रपटांची टक्कर होताना दिसतेय.’वेड’ ‘कुत्ते’ आणि ‘वरिसु’ हे चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांना घेऊन येण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. पण या सगळ्यात थलपथी विजयच्या ‘वरीसू’ या चित्रपटाने जबरदस्त कामगिरी केली आहे.

11 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. इमोशनल फॅमिली ड्रामा आणि ॲक्शन यांचे मिश्रण असलेल्या हा चित्रपटत सध्या तिकीट बारीवर धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनाच्या तीन दिवसातच या चित्रपटाने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने जगभरातून 103 कोटींची कमाई केली. त्यामुळे ‘वरिसु’ 100 कोटींचा आकडा पार करणारा थलपथी विजयची दहावा चित्रपट ठरला आहे. सध्या सोशल मीडियावर देखील याच चित्रपटाचा बोलबाला पाहायला मिळत असून,

येणाऱ्या काळात हा चित्रपट कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटात विजय सोबत प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्यभूमीकेत आहे. तसेच, प्रभू, सरथ कुमार, प्रकाश राज, जयसुधा, श्रीकांत, शाम, योगी बाबू, संगीता आणि संयुक्ता यांच्या देखील चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.