मुबई |
वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी वाचनालयांना निधी तसंच पुस्तकं देण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नेहमीच भूमिका मांडली होती. आज त्या अनुषंगानं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात ६०% वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
उच्च व तंत्र शिक्षण संदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. वाचन संस्कृतीला गती देण्यासाठी पुढील काही निर्णय घेण्यात आले आहेत.
१ . शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात ६० % वाढ करण्यात येणार.
२. महाराष्ट्रामध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी युती सरकारने शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात ६० % वाढ करण्याचा निर्णय.
३. यामुळे विविध विषयांवरील ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करून देणे या ग्रंथालयांना शक्य .