पुणे |
कोथरूड मतदारसंघातील बाणेर भागात ज्येष्ठ नागरिकांसाठीची विशेष सोसायटी असून, या सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
चंद्रकांत दादा बोलताना म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी नाना – नानी पार्कची लवकरच निर्मिती केली जाईल. यावर तात्काळ आमदार निधीतून यासाठी तरतूद करु अशी ग्वाही दिली. तसेच, आगामी काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी कोल्हापूर प्रमाणे पुण्यातही विरंगुळा केंद्र विकसित करण्याचा प्रयत्न करु, असे आश्वास्त केले.

यावेळी सोसायटीच्या चेअरमन वैशाली वैद्य, वासुदेव महाजन, घनश्याम खोबरेकर, रामकृष्ण अत्रे, प्रज्ञा कर्णिक, सुभाष जोशी, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा नेते प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.