” हि दादागिरी नाही चालणार.! ” जयंत पाटीलांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर
पुणे |
हर हर महादेव सिनेमातील काही दृशांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपट गृहात जाऊन प्रेक्षकांना हुसकावून लावत चित्रपटाचा शो आपल्या समर्थकांच्या साथीने बंद पाडला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस कडून अटकेचा निषेध करत आंदोलन करण्यात आले, याबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईचे समर्थन करत ” कायदा हातात घेतल्यानंतर जी शिक्षा होयची ती होणारच..! असे म्हंटले आहे. आज ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
एखादा सिनेमा एखादी कॉन्सेप्ट, स्टोरी आवडली नाही तर तुम्ही बाहेर गळ्यात बोर्ड घेऊन उभे राहत सदर कला कृती पाहू नये हे इतिहासाचे भंजन आहे, पण थिएटरमध्ये स्वतःच्या पैशाने जाऊन बसणाऱ्यांना हुसकावता कशासाठी ? असा प्रश्न देखील पाटील यांनी या वेळी केला. आव्हाडांना अटक म्हणजे इतिहासाची मोडतोड करणाऱ्यांना राज्यसरकारचे समर्थन या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या टीकेचा “तुम्ही म्हणाल तो इतिहास का ? प्रत्येकाला इतिहास हो कळला, प्रत्येकाच्या भावविश्वाला जे भावलं ते तो मांडणार. हुकूमशाही आली आहे का? तुम्हाला पाहिजे तेच मांडलं पाहिजे का ? हि दादागिरी नाही चालणार.! म्हणत प्रत्युत्तर दिले.
राष्ट्रवादीकडून सिनेमाच्या या वादाला सुरवात झाली असली तरी मनसे आणि इतर मराठा संघटनाही आता यामुळे एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत.
काहींनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यावर सिनेमा करीत असाल तर सिनेकाची एक प्रत प्रदर्शनाआधी वंशजांना तपासण्यास द्यावी म्हंटले आहे तर सेन्सॉर बोर्ड कडून मान्यता असतांना देखील राजकीय जाच कशासाठी ? असा प्रश्न चित्रपट सृष्टीतील निर्मात्यांना पडला आहे.