Latest Marathi News

BREAKING NEWS

सत्यजित तांबे आमदार झाल्यावर सासरवाडीत अर्थात सांगलीत जल्लोष

0

नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये अपक्ष सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजयी मिळवला. या निकालानंतर सत्यजित तांबे यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला, तसाच आनंद सांगलीमध्येही व्यक्त करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पारे गावचे सत्यजीत तांबे जावई असल्याने त्यांनीही आनंद व्यक्त केला.

तसेच परिसरात नवनिर्वाचित आमदार ‘जावई’ पाहुण्यांचे पोस्टरही लावण्यात आले. सत्यजीत यांच्या विजयानंतर विटा शहर तसेच पारे गावात अभिनंदनाचे फलक झळकले. पारे परिसरात जल्लोष करण्यात आला. सासरे संदीपशेठ, पत्नी नंदिनी, मुलगा भूषण, सून दिशा यांच्यासह साळुंखे कुटुंबियांनी कन्येच्या घरी जाऊन जावई पाहुण्यांचे अभिनंदन केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आ. सत्यजीत हे भाचे असून पारे येथील भीमरावशेठ साळुंखे यांचे सुपूत्र संदीपशेठ साळुंखे यांचे आ. तांबे हे जावई आहेत.

सत्यजीत तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली या बीडीएस असून त्यांचे शिक्षण चेन्नईत झाले. डॉ. मैथिली यांचा आमदार सत्यजीत यांच्याशी 2011 मध्ये पुण्यात विवाह झाला होता. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधरच्या एकतर्फी लढतीत अखेर गेल्या महिनाभर चर्चेत असलेल्या सत्यजीत तांबे यांचा दणदणीत विजय झाला. पहिल्या दिवसांपासून या निवडणुकीत तांबेमुळे एवढ्या नाट्यमय घडामोडी घडूनही विजय झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.