Latest Marathi News

BREAKING NEWS

“काळाच्या पुढे असलेले सावित्रीबाईचे विचार पिढ्यानपिढ्या प्रमाणात देतील…! – चंद्रकांत पाटील

0

पुणे |

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व महिला शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी रोजी जयंती आयुष्यभर समाजाच्या भल्यासाठी दडपडणाऱ्या संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्या काळात मुलींना शिक्षण म्हणजे अशक्यच गोष्ट होती, अशावेळी सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाची दारे खुली केली. काळाच्या पुढे असलेले सावित्रीबाईचे विचार पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहतील, असे प्रतिपादन ही चंद्रकांतदादांनी केले.

सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षण याबरोबरच समाज सुधारणा, केशवपण, भ्रूणहत्या व विधवा आत्महत्या या क्षेत्रातील भरीव कार्य केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.